येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून १० सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत. आज दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील. इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही ५१ वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि ९ इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.
EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.