सोलापूर – येथील सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन च्या वर्ष २०२१-२३ कालावधीकरिता अध्यक्षपदी ईश्वर मालू तर सचिवपदी आनंद येमूल यांची फेरनिवड करण्यात आली. शंनीवार दिनांक ४ डिसेंबर रोजी अक्कलकोट रोडवरील चव्हाण सभागृह येथे झालेल्या वार्षिक सभेत मुख्य निवडणूक अधिकारी जितेंद्र राठी यांनी हि निवड बिनविरोध झाली असल्याचे जाहीर केले. निवडणूक अधिकारी म्हणून केतन शाह, शिवप्रकाश चव्हाण , दीपक मुनोत यांनी काम पाहिले .
प्रारंभी सचिव आनंद येमूल यांनी वार्षिक अहवाल सादर केला तर खजिनदार भूषण भुतडा यांनी हिशोब सादर केला. उपाध्यक्ष सुरजरतन धूत यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व माजी अध्यक्षांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये केतन शाह, दिलीप राऊत, सतीश मालू, आनंदराज दोषी, जितेंद्र राठी , दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण,.समीर गांधी, विपीन कुलकर्णी, कौशिक शाह व खुशाल देढिया यांचा समावेश होता. कार्यालयीन कामकाज पाहणारे रमेश कुलकर्णी यांचा ही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या प्रसांगी नूतन अध्यक्ष ईश्वर मालू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सभांसदांचे सर्वांचे आभार मानत संघटनेस अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. वर्ष २०२१-२३ करीता निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – ईश्वर मालू, उपाध्यक्ष – डॉ. सुरजरतन धूत, सचिव – आनंद येमूल, खजिनदार – भूषण भुतडा . सह सचिव – , माजी अध्यक्ष – खुशाल देढिया ,संचालक सर्वश्री – सुयोग कालाणी , हरीश कुकरेजा, सुनील भांजे, गिरीश मुंदडा, विजय टेके व नंद अहुजा. सभेच्या शेवटी सहसचिव सूर्यकांत कुलकर्णी यांनी आभार मानले