सांगली ( सुधीर गोखले) – दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या टेम्भू, ताकारी म्हैसाळ योजनांबरोबरच राज्यातील अन्य सिंचन योजनांना आता वीजदर दरवाढ आणि पाणीपट्टी वाढीचा दुहेरी फटका बसणार आहे साधारण एप्रिलपासून वीजदर वाढ होणार असून सध्याची १ रु १६ पैसे प्रति युनिट दराने होणारी आकारणी आता ५ रु २६ पैसे प्रति युनिट एव्हडी वाढणार आहे. त्यामुळे पर्यायाने पाणीपट्टी हि वाढणार आहे.
शासनाने ८१-१९ असे प्रमाण सिंचन योजनांसाठी १ मार्च २०१८ पासून स्वीकारले असून ८१ टक्के शासन निधी आणि १९ टक्के वीजबिल आणि पाणीपट्टी सिंचन योजनेचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. मात्र आता या योजनांच्या वीजबिलात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.
एका टी एम सी साठी कोट्यवधींचे वीजबिल
टेम्भू आणि ताकारी सिंचन योजनेसाठी साधारण एक टी एम सी पाणी उचलण्यासाठी पूर्वी १ रु १६ पैशानी ३ कोटी २६ लाख बिल यायचे तेच आता दरवाढीमुळे दहा कोटी पन्नास लाख रु बिल अपेक्षित आहे मात्र हि दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड म्हणावे लागेल.