येस न्युज मराठी नेटवर्क : चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झालेली कोरोनाची लागण यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. चेन्नईच्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली पाहून यंदाच्या हंगामात सलामीच्या सामन्यातून चेन्नईचा पत्ता कट होऊन विराट कोहलीच्या RCB संघाला संधी मिळण्याचे संकेत मिळत होते. परंतू बीसीसीआय ठरवल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना आयोजित करण्याची तयारी करत आहे.