दिनांक एक मे 2025 पासून छत्रपती संभाजी नगर येथे सोळा वर्षाखालील मुलांचे इनविटेशन सामने सुरू झाले आहेत.
पहिल्या सामन्यात जळगाव संघाने सोलापूर संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर तीन गुण प्राप्त केले सोलापूर संघाला एक गुण मिळाला.
धावफलक
सोलापूर संघ सर्वबाद 223 धावा
दर्शील फाळके 57 धावा, संदेश गाडी 26 धावा, सोहम कुलकर्णी 31 धावा, अभिजीत सरवदे 58 धावा व प्रसाद मुके 21 धावा
पहिल्या डावात जळगाव संघाने नऊ गडी बाद तीनशे दोन धावांवर डाव घोषित केला.
सोलापूर संघाकडून यश माने देशमुख यांनी तीन बळी, श्रवण माळी दोन बळी, अभिजीत सरवदे, दर्शील फाळके व विश्वजीत गोडसे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला
दुसऱ्या डावात सोलापूर संघाने आठ बाद 168 धावांवर डाव घोषित केला.
दुसऱ्या डावात सोलापूर संघाकडून विराज वर्मा 72 धावा, अभिजीत सरवदे 50 धावा केल्या.
दुसऱ्या डावात जळगाव संघाने पाच गडी गमावून 59 धावा केल्या.
सोलापूर संघाकडून श्रवण माळी तीन बळी व दक्षिण फाळके एक बळी घेतला.
अशा रीतीने जळगाव संघाने पहिल्या डावातील आघाडीवर तीन गुण घेतले व सोलापूर संघाला एक गुण प्राप्त झाला आहे.
दिनांक 4 व 5 मे 2025 रोजी सोलापूर संघाचा दुसरा सामना नंदुरबार जिल्हा संघाबरोबर झाला त्यामध्ये सोलापूर संघाने नंदुरबार संघाचा दहा गडी राखून पराभव केला व स्पर्धेत सात गुण प्राप्त केले आहेत.

धावफलक
नंदुरबार पहिला डाव सर्व बाद 75 धावा.
पहिल्या डावात सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी याने 16 धावात सहा बळी घेतले व श्रवण माळी याने 16 धावात चार बळी घेतले.
सोलापूर संघाने पहिल्या गावात नऊ गडी बाद 205 धावांवर डाव घोषित केला.
सोलापूर संघाकडून पहिल्या डावात दर्शील फाळके 56 धावा, संदेश गाडे 36 धावा, विश्वजीत गोडसे 28 धावा, मयंक पात्रे 19 धावा व सार्थक कन्ना याने नाबाद 40 धावा केल्या.
दुसऱ्या डावात नंदुरबार संघाने सर्व बाद 178 धावा केल्या.
सोलापूर संघाकडून दुसऱ्या डावात सोहम कुलकर्णी याने 39 धावात तीन बळी, श्रवण माळी 40 धावात दोन बळी, यश माने देशमुख तीन धावात एक बळी व सार्थक कन्ना याने 23 धावात दोन बळी घेतले.
दुसऱ्या डावात सोलापूर संघाने बिनबाद 49 धावा करून सामना जिंकला व सात गुण प्राप्त केले.
सोलापूर संघाचे एकूण आठ गुण झाले आहेत.
दिनांक सात व आठ मे 2025 रोजी सोलापूर संघाचा सामना हिंगोली जिल्हा संघाबरोबर होणार आहे.
