येस न्युज नेटवर्क : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा आता पूर्ववत झाली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवल्याने मोठा राडा झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
मागील 38 तासांपासून कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद होती. परिणामी नागरिक आपले व्यवहार करु शकत नव्हते. इंटरनेटचा वापर करु शकत नव्हते. कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये आणि अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अनेक कामं खोबळंबली होती, बँकेचे तसंच इतर व्यवहार ठप्प झाले होते. आता इंटरनेट सेवा सुरु झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.