सोलापूर – दि. 21 जून 2025 सकाळी 8 वाजता सिद्धेश्वर मंदिर सोलापूर येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 9 महाराष्ट्र बटालियनचे लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर , ॲड.मनोज पामुल, साक्षी तट्टे कॅप्टन.शिल्पा लब्बा, कॅप्टन गौस शेख, मेजर भानुदास बडसोडे , CTO तुकाराम साळुंखे ,जॉन सर,कोळी हे एनसीसी ऑफिसर उपस्थित होते



सोलापूर शहरातील जवळपास 500 एनसीसी कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते.
यासाठी लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर व एनसीसी ऑफिसर यांनी योगा साधनेत सहभाग नोंदवला.
याप्रसंगी ॲड.मनोज पामुल, साक्षी तट्टे यांनी एनसीसी कॅडेट्सना योग दिन व योगाचे आपल्या जीवनात महत्त्व याबद्दल माहिती देण्यात आली.शारीरिक व मानसिक विकास होण्याकरिता योग खूप महत्वाचा आहे असे मत ॲड.मनोज पामुल यांनी व्यक्त केले.
एनसीसी मध्ये सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सी सर्टिफिकेट परीक्षा 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या एनसीसी कॅडेट्सना सी सर्टिफिकेट प्रमाणपत्रांचे वाटप 9 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे AO लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर याचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा विपत यांनी केले पाहुण्यांचा परिचय उर्मिला गिडवीर यांनी करून दिला व आभार प्रदर्शन कॅप्टन गौस शेख यांनी केले.