जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर च्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस हुतात्मा स्मारक परिसरामध्ये सकाळी सहा वाजता व्यायाम करून साजरा करण्यात आला.
सोलापूर शहरांमधील सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास खास योग प्रशिक्षक येमूल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास ग्रंथ मित्र मार्गदर्शक कुंडलिक मोरे , पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिद्दी, डॉ.भीमाशंकर बिराजदार, अॅड.संगीता कुमठेकर हिराचंद नेमचंद वाचनालयाचे ग्रंथपाल दत्ता मोरे, ग्रंथपाल वृषाली हजारे, लिपिक सारिका माडीकर, रमा ईप्पलपल्ली, ज्योतीराम चांगभले महाराज, यल्लाप्पा घोडके, धोंडीराम बंडगर ,नागेश सरगम, सिद्धाराम ख्याडे यांच्यासह शेकडो कर्मचारी, पदाधिकारी ,अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय अधिक कार्यलयाचे प्रमोद पाटील , संजय ढेरे, प्रदीप गाडे, यल्लाप्पा घोडके यांच्या परिश्रमाने कार्यक्रम संपन्न झाला