सोलापूर – उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून, योग प्रशिक्षिका वनिता डेरे, मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,हरुण तांबोळी , सुधाकर कुलकर्णी,सायराबानू तांबोळी, दिपाली कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविकेतून योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रशालेतील क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी आपल्या मनोगताद्वारे योग योग दिनाचा इतिहास व योग दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. समजावून सांगितले. आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नाही. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय योगाचा स्वीकार जगातील अनेक देशांनी स्वीकारला पण भारतीयांनाच त्याचा विसर पडला आहे. योग व प्राणायामामुळे शरीर स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य देखील लाभते त्यामुळे विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांनीही देखील योग व प्राणायाम करावा असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.योग प्रशिक्षिका विमल ढुरे यांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकाद्वारे पूरक व्यायाम, ताडासन वृक्षासन चक्रासन प्राणायाम,ध्यान , भामरी, अनुलोम विलोम, कपालभाती,इ.प्रत्येक आसनाचे महत्त्व व ते कसे करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रशालेतील 1300 विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिकात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी तर आभार सोनाली उंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, अभिजीत पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, प्रीती वऱ्हाडे, सोनल आळंद, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच बसप्पा कुंभार, हरी ऐवळे, सुनंदा भालेराव, चंद्रशेखर कबाडे आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्रशालेचे कलाशिक्षक प्रविण कंदले यांनी फलक लेखन अप्रतिम रेखाटले होते
