सोलापूर – सोलापूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) चे कार्यवाहक विमानपत्तन संचालक अंजनी कुमारी, दीपक मुरारी केलूस्कर, प्रबंधक (मानव संसाधन), मुरलीकृष्णा मानेम, प्रबंधक (अभि. विद्युत), निलेशकुमार एन. धामेचा, प्रबंधक (संचार) आणि कर्मचारी उपस्थित होते त्यासोबतच, हवामान विभाग (IMD), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) Corporation, महाराष्ट्र सुरक्षा बल, (MSF) Fly91 या विमान कंपनीचे कर्मचारी तसेच इतर कान्ट्रैक्ट वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

योग दिनाची सुरुवात सकाळी 6.00 वाजता योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार व विविध योगासने सादर करून करण्यात आली. उपस्थितांनी सामूहिकरित्या प्राणायम व ध्यानसाधना करत योगाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यदायी लाभांविषयी अनुभव घेतला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते योगाच्या महत्त्वावर भाषणे झाली आणि सर्व कर्मचान्यांना दररोजच्या आयुष्यात योगाचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन AAI सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले होते.