सोलापूर, २१ जून २०२४: आज दिनांक २१ जून २०२४ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिवस”निमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे एका उत्साही आणि आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ. वैशाली कडुकर, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर आणि अनुराधा उदमले, उपप्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली श्री. छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सकाळी ६ः१५ ते ७ः३० पर्यंत सामूहिक योग सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रात आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग पोलीस अधिकारी/अंमलदार आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. प्रसिद्ध शासनमान्य योग प्रशिक्षक सौरभ बोत्रा यांनी ऑनलाईन (डिजिटल माध्यमाद्वारे) योगासने आणि श्वसनक्रिया यांचे प्रशिक्षण दिले. यात सूर्यनमस्कार, विविध आसने आणि श्वसनक्रिया यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोप समारंभात, मा. प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी/अंमलदार आणि प्रशिक्षणार्थी यांना योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यांना नियमित योगाभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाद्वारे पोलीस प्रशिक्षण केंद्राने:
- पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढवण्याचा प्रयत्न केला.
- योगाचे महत्त्व आणि फायदे याबद्दल जागरूकता निर्माण केली.
- पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव व्यवस्थापन आणि एकाग्रता वाढवण्यास मदत केली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन.