सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. स्वामी विवेकानंद केंद्राचे प्रशिक्षक व कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी विजयकुमार मेरगू यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, या दिवसाचा उद्देश अध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्याबद्दल जागरुकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. योगाचे महत्व अशा प्रकारे वाढत आहे की, केव
ळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Helthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. असे मत व्यक्त केले. दिपिका मेरगू, ऐश्वर्या गडगी, लावण्या गुंडला,कोमल मेरगु, प्रविणकुमार मेरगू यांनी विविध योगासनाचे महत्व सांगून योगासने सादर केली, यात सूक्ष्मव्यायाम, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धवक्रासन, वक्रासन, शशांकासन, त्रिकोणासन, सुर्यनमस्कार, मकरासन, भुजंगासन असे योगासनाचे विविध प्रकार घेण्यात आले..
याप्रसंगी सर्व प्रशिक्षकांचे प्राचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. सदर प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे प्रशालेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वदेशी संदेशाने झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू यांनी विशेष परिश्रम घेतले.