आज २१ जून २०२५ रोजी, डी.व्ही. ढेपे इंग्लिश मीडियम स्कूल, बाळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग प्रशिक्षक, डॉ.सूर्यकांत धप्पाधुळे यांच्या मार्गदर्शनाखालील योग सत्राने, तसेच प्राणायाम आणि ध्यान सत्राने सकाळ खूपच सामंजस्यपूर्ण आणि ताजीतवानी झाली. सोलापूर निमा शाखेचे सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला, ज्यामुळे निरोगी जीवनशैली आणि मजबूत सामुदायिक संबंधांसाठीची आपली सामूहिक वचनबद्धता आणखी दृढ झाली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता ढेपे यांनी केले .यावेळी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी योगा एक्स्पर्ट प्रणाली शिंदे व जान्हवी यांनी विविध योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.डॉ रविराज गायकवाड यांनी योगाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार डॉ प्रवीण ननवरे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी निमा चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विनायक टेंभुर्णीकर ,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ साहेबराव गायकवाड , निमा महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ रविराज गायकवाड , सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ नागनाथ जिडडीमनी, सचिव डॉ अभिजित पुजारी, खजिनदार डॉ प्रवीण ननवरे,उपाध्यक्ष डॉ सचिन बोंगरगे, कार्यकारणी सदस्य डॉ किरण देशमुख, डॉ सुधीर कुंभार,डॉ महेश पिंगळे तसेच,निमा वुमन्स फोरम राष्ट्रीय कार्यकारणी सभासद डॉ राजश्री मठ ,सोलापूर निमा वुमन्स फोरम अध्यक्षा डॉ श्रुती मराठे, सचिव डॉ पल्लवी भांगे, खजिनदार डॉ अश्विनी देगावकर, सदस्या डॉ स्मिता बुब ,डॉ आशा माने,डॉ पूजा शेळवणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल ढेपे सर तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.