नवी दिल्ली : परदेशात जाऊ पाहणाऱ्यांचे स्वप्न सध्यातरी अधुरंच राहणार आहे. कारण केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी 31 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांवरील प्रतिबंध एका महिन्यासाठी वाढवले आहेत. मात्र, काही मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे 23 मार्च 2020 रोजी भारतात शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्दबातल ठरवण्यात आली होती. आदेशात म्हटले आहे की , 31 जुलै, 2021 च्या 23:59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध कायम राहतील. गेल्या वर्षी 23 मार्च रोजी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू करण्यात आलेले निर्बंध आजही कायम आहेत.