सोलापूर : पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष सोलापूर शहर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील बदली मानव संसाधन विकास महिला सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. विजापूर नाका पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अजय आत्माराम जगताप यांची बदली सायबर शाखा येथे करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नारायणपेटकर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय संपतराव पाटील यांची बदली गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे.महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती योगेश कडू यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांची बदली सदर बझार पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पंढरीनाथ खंडागळे यांची दंगा नियंत्रण पथक येथे करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक येथे करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंडीतराव सोळंखे यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. जेलरोड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक शशिकांत जरिचंद लोंढे यांची बदली सदर बझार पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. सदर बझार पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गोविंद गायकवाड यांची बदली विजापूर नाका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी मच्छिंद्र मस्के कोर्ट पैरवी येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व डायल 112 येथील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी नागनाथ तळे यांची बदली जेलरोड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. मानव संसाधन विकास येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक शिवशंकर भगवान बोंदर यांची बदली पोलीस निरीक्षक (गुन्हे एमआयडीसी) पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. तर जेल रोड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज नुरुद्दीन यांची बदली गुन्हे शाखा, सोलापूर शहर येथे करण्यात आली आहे.