सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साही वातावरणात लेझीम चा बहारदार खेळ सादर करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी माननीय डॉ. सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र कोठे प्रथमेश दादा कोठे यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची पूजा व पुष्पहार अर्पण करून तसेच विधिवत पूजन करून श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी शाळेतील इयत्ता सातवी व आठवी च्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे बहारदार खेळ सादर करून सर्वांच्या लक्ष वेधून घेतले होतें. सदर मिरवणूक सुशील रसिक सभागृह या ठिकाणी सुरु होऊन सूर्या होटेल मार्गे मेकॅनिक चौक नविवेस पोलिस चौकी मार्गे सूपर मार्केट व शाळा या ठिकाणी मार्गस्थ झाली होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय महेश अण्णा कोठे, डॉक्टर राधिका ताई चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे ,माननीय देवेंद्र दादा कोठे ,माननीय प्रथमेश दादा कोठे ,प्राध्यापक विलास बेत ,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.