सोलापुरातील येस न्यूज मराठीच्या अवंतीनगर येथील कार्यालयात बुधवारी सकाळी पर्यावरण पूरक अशा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे तसेच गीतांजली सुरवसे यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. यावेळी येस न्यूज मराठीचे व्हिडिओग्राफर विजय आवटे, रवी फुटाणे, शिवानंद जाधव, महेश चवरे, मनमोहन भोसले, शांता सुरवसे, राणी इंगळे, शुभम इंगळे, हर्षाली आणि सिद्धी सुरवसे तसेच प्रशांत काळे आदी उपस्थित होते. या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये टॉप 25 तसेच टॉप 20 या दररोजच्या बातमीपत्रासह विविध अशा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती शिवाजी सुरवसे यांनी दिली







