सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे, रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या कडून कुर्डुवाडी – मिरज सेक्शनचे निरीक्षण करण्यात आले. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सुरुवात करण्यात आली. त्याठिकाणी कुर्डुवाडी रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांच्याशी संवाद करून स्थानकावरील समस्या, स्वच्छता आणि आषाढी पंढरपूर यात्रे संबंधी कुर्डुवाडी रेल्वे स्थानक खूप महत्वाचे असते त्या संबंधी रेल्वे स्थानकात तयारीचा आढावा घेण्यात आला.
मोडनिम्ब रेल्वे स्थानक परिसरातील नवीन प्रस्तावित गती शक्ती कार्गो टर्मिनलची (GCT) पाहणी केली. भविष्यात रॅक क्षमता वाढविण्यासाठी सायडिंगचा विस्तार, करण्या संबंधित जागेची पाहणी केली. पंढरपूर रेल्वे स्थानकावर, स्टेशन व्यवस्थापकासोबत चर्चा करून अमृत स्टेशन योजनाच्या कामाची पाहणी, स्टेशन वरील समस्या, स्वच्छता आणि येणाऱ्या आषाढी यात्रेचे नियोजन, आषाढी यात्रेत येणाऱ्या वारकरण्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अतिरिक्त बुकिंग विंडो, प्रवासी मदत केंद्र, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, रेल्वे स्थानक परिसर स्वच्छते विषयी कसून चौकशी केली.
अरग रेल्वे स्थानका वरील गुड्स शेडची पाहणी केली. त्यात काम करीत असलेल्या माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या, गुड्स शेड मधील स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) चंद्रभूषण,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे एन गुप्ता, विभागीय अभियंता (मध्य) रवींद्र सिंगल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टिआरडी) अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (जनरल) अभिषेक चौधरी, विभागीय सुरक्षा आयुक्त या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.