सोलापूर – जिल्हा परिषदेने आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देणेत येणारे विविध सुविधांच्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करणेत आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जाऊन सुविधांची पाहणी केली. त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर मंदिर समितीच्या वतीने समितीचे कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. या प्रसंगी आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देणेत येणारे सुविधांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करणेत आले. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक दिलीप स्वामी यांनी संपादित केलेल्या या माहिती पुस्तिकेत सुविधांची सर्व माहिती आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे मार्गदर्शना खाली ही माहिती पुस्तिका बनविणत आली आहे. या प्रसंगी या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार राजाभाऊ राऊत, ग्रामीण पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्यमंत्री कार्यालयातील वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, उप जिल्हाधिकारी गजाजन गुरव, शिवाजीराव सावंत, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मनिष काळजे, संजय साठे, राजाभाऊ खरे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेने पालखी मार्गांवर दिलेल्या विविध सुविधांची माहिती या पुस्तिकेत देणेत आली आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी निवारा केंद्र, हिरकणी कक्ष, हरित वारी अंतर्गत वृक्षारोपण, पालखी स्थळाची स्वच्छता, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, महिलांसाठी शौचालय व्यवस्था, महिलांसाठी स्नानगृह, अशा विविध सुविधांची माहिती देणेत आली आहे.