• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, August 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशी बनावटीचे गावठी पिस्तूल- जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगल्याने

by Yes News Marathi
February 9, 2021
in इतर घडामोडी
0
देशी बनावटीचे गावठी पिस्तूल- जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगल्याने
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे आणि त्यांच्या पथकास मिळालेल्या खबरीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या घेतलेल्या झाडा-झडतीत त्यांच्याजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुसे मिळून आली. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याचा गुन्ह्यात दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एका चार चाकी वाहनासह सहा लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रविवारी, दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुखे, पोलीस उप निरीक्षक शैलेश खेडकर व अंमलदार असे सोलापूर शहरात मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबरोबरच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग करीत होते. पोलीस निरीक्षक संजय साळुखे यांना २ इसमांकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे, ते पिस्तुल घेऊन ते हैद्राबाद रोड सग्गम नगर येथून त्यांच्या कार (क्र. एम.एच.१३ बी.एन. ८६८०) मधून सोलापूर शहरात येत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक खेडकर व पथकातील अंमलदार यांनी पंचासह हैद्राबाद रोडवरील हॉटेल स्वादचे समोरील विरुध्द बाजूचे मुळेगांव क्रॉस रोडचे बाजूस सग्गम नगरकडे जाणारे अंतर्गत कच्च्या रोडवर सापळा लावला. थोड्या वेळात एक ग्रे कलरची चारचाकी कार (क्र. एम.एच.१३. बी.एन. ८६८०) मधून २ इसम येत असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या गोपनिय खबरीनुसार कारच्या वर्णनाची खात्री पटल्याने, पोलीस स्टाफने त्यांना गराडा घालून जागीच पकडले. त्यांची नावे व पत्ते विचारता कार चालकाने त्याचे नाव यासीन जब्बार कामतीकर (वय -३२ वर्षे, रा . स्वाद हॉटेल समोरील सग्गम नगर, हैद्राबाद रोड, सोलापूर) व त्याचे शेजारील सिटवर बसलेल्या इसमाने आपले नाव समद उर्फ अलीम उर्फ अल्लू मकतुम शेख (वय -३४ वर्षे, रा. घर नं. ८२३, बाबा कादरी मशीद जवळ, उत्तर कसबा, सोलापूर) अशी असल्याचे सांगितले.

त्यांना त्यांचेकडील कारचे कागदपत्रांबाबत व मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, ते उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले. पोउनि खेडकर यांनी पंचासमक्ष त्यांचे कारची व त्यांची अंगझडती घेतली असता, कार चालक यासीन कामतीकर याचे अंगावरील नेसते पॅन्टमध्ये डावे बाजूस कंबरेजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल खोचलेल्या अवस्थेत मिळून आले, त्याचे पॅण्टचे उजव्या खिशात दोन वापरते मोबाईल मिळून आले. कारमध्ये त्याचे शेजारचे सिटवर बसलेला इसम समद ऊर्फ अलीम उर्फ अल्लू शेख याचे अंगावरील पॅण्टचे उजव्या खिशात ०३ जिवंत काडतूस मिळून आले. त्यांनी ते पिस्तुल व काडतुसे ही बेकायदा विनापरवाना जवळ बाळगलेचे चौकशीत निष्पन्न झाल्याने, पोउनि खेडकर यांनी पंचांचे समक्ष त्यांचेकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल, ०३ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व त्यांच्याकडील चारचाकी कार असा एकुण ६ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात उभयतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

…यांनी पार पाडली कामगिरी
ही कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुखे, पोलीस उप-निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार अशोक लोखंडे, शंकर मुळे, राजू चव्हाण, विजय वाळके, संदीप जावळे, संतोष येळे, सुहास अर्जुन, स्वप्निल कसगावडे, चापोना. संजय काकडे, विजय निंबाळकर, यांनी पार पाडली.

Previous Post

खा.जयसिद्धेश्वर यांचा बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

Next Post

सोलापूर जिल्हयातील १०,००० लाभार्थ्यांना कोवीड लस एकाच दिवशी देणार

Next Post
सोलापूर जिल्हयातील १०,००० लाभार्थ्यांना कोवीड लस एकाच दिवशी देणार

सोलापूर जिल्हयातील १०,००० लाभार्थ्यांना कोवीड लस एकाच दिवशी देणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group