टोकियो : सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मिळवणाऱ्या एम.सी. मेरी कोम (५१ किलो) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसर्या मानांकित इन्ग्रिट व्हॅलेन्सियाकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला.
महिला ५१ किलो गटात कोलंबियाच्या इन्ग्रिट व्हॅलेन्सियाकडून पराभव झाल्याने भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे.पहिल्या फेरीत मेरीला कोलंबियाच्या बॉक्सरकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला, तर दुसर्या फेरीत भारतीय मेरीने जोरदार पुनरागमन करत ३-२ असा विजय मिळविला. तर, तिसऱ्या फेरीत व्हॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केले नाही तर सामना ३-२ ने जिंकला.मेरी कोमने याआधी दोन वेळा कोलंबियन बॉक्सरचा सामना केला होता आणि दोन्ही सामने जिंकले होते. ज्यामध्ये २०१९ च्या जागतिक अजिंक्यपदांच्या उपांत्यपूर्व फेरीचा समावेश होता.