सोलापूर : इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे येथील सिव्हिल हॉस्पिटल ला ७ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर व २०० टी बॅग्स असा सुमारे दहा लाख किमतीची वस्तू भेट देण्यात आली. या वस्तू इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबई व औरंगाबाद शाखेने पाठविल्या असून त्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर शखेद्वारे प्रदान करण्यात आल्या. याप्रंसंगी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर, डाॅकटर पुष्पा अग्रवाल इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव प्रधान, मानद सचिव जयेश पटेल, सह सचिव खुशाल देढिया, संचालक सिए राजगोपाल मिनियार उपस्थित होते.