भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान व्होजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. यूट्यूब हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी 16 फेब्रुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली .
YouTube चे CEO होण्यापूर्वी नील मोहन यांनी कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वी, मोहन यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये देखील काम केलं आहे. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी जवळपास 15 वर्षे एकत्र काम केले आहे. नील मोहन आता अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत काम करतील. सुंदर पिचाई हे देखील भारयी वंशाचे आहेत. नील मोहन यांच्या पत्नी हेमा सरीम मोहन या देखील भारतीय वंशाच्या आहेत. याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत.