येस न्युज नेटवर्क : भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी नेहमीच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असते. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला क्रिकेट युद्ध असेही बोलले जाते. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी सुरूवातीपासून अगदी शेवटच्या षटकापर्यंत या दोन संघातील सामना पाहतात. मात्र, आता भारत-पाकिस्तान सामन्याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण तब्बल 2027पर्यंत भारत आणि पाकिस्तान कोणतीही मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2023 ते 2027पर्यंतचा आपला कार्यक्रम जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या 2023 ते 2027पर्यंतच्या कार्यक्रमानुसार, भारतीय संघ पुढील पाच वर्षांत पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. बीसीसीआयने राज्य क्रिकेट बोर्डांना सांगितलेल्या भविष्यातील कार्यक्रमात पाकिस्तानचा कॉलम रिकामा ठेवण्यात आला आहे.