जम्मू-काश्मीरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरला अपघात झाला ते लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आहे. तांत्रिक बिघाडामुळे लष्कराचे हे हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंगदरम्यान चिनाब नदीत कोसळले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाले नाही आहे.
अधिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा पायलट आणि को-पायलट यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला तांत्रिक बिघाडाची माहिती दिली आणि ते इमर्जन्सी लँडिंगसाठी निघाले. त्यांनी हेलिकॉप्टर मारुआ नदीच्या काठावर उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी दुर्दैवाने हा अपघात झाला आहे. खडबडीत जमीन आणि अप्रस्तुत लँडिंगमुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरू शकले नाही आणि ते त्याठिकाणी कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, को-पायलट तसेच एक तंत्रज्ञ उपस्थित होते.
घटनास्थळी बचावकार्य सुरु
घटनेची माहिती समजताच घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. दुर्घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. ज्या किश्तावाडा परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय तो अत्यंत दुर्गम परिसर असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थांबून थांबून पाऊस पडत होता.
अपघातात तिघे जखमी
हे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळल्याचं लष्कराने म्हटलं आहे. भारतीय लष्कराच्या अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण उपस्थित होते, ते तिघेही जखमी झाले आहेत. विमानात दोन पायलट आणि एक तंत्रज्ञ होते. तिन्ही जखमी जवानांना उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. खराब हवामान, व्यवस्थित लँडिंग न होणे, तांत्रिक अडचणी आदी गोष्टींमुळे अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत