टोकियो : ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आले . रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, “मुलींच्या कामगिरीने नव्या भारताची भावना प्रदर्शित केली आहे. या महान कामगिरीची आम्हाला नेहमी आठवण राहील.”पीएम मोदींनी ट्वीट केले, टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची उत्कृष्ट कामगिरी आम्हाला नेहमीच लक्षात राहील. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. संघातील प्रत्येक सदस्याला उल्लेखनीय धैर्य, कौशल्य आणि लवचिकता लाभली आहे. भारताला या शानदार संघावर गर्व आहे.
”नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले की, ” जरी आपण महिला हॉकीमध्ये खूप कमी फरकाने पदक गमावले. परंतु हा संघ नवीन भारताची भावना प्रतिबिंबित करतो. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे टोकियो २०२० मधील यश भारताच्या तरुण मुलींना हॉकीकडे वळण्यास आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल. या संघाचा अभिमान आहे.”