भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानने नेमका काय दावा केला?
भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय. गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताकडून ड्रोन हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानच्या आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी केला आहे. भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.