सोलापूर – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज इंद्र भवन येथे महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त तैमूर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर,मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, आरोग्य अधिकारी राखी माने,मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, ओमप्रकाश वाघमारे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित खानसुळे, प्र.अग्निशमन प्रमुख अच्युत दुध्याळ, श्रीगणेश बिराजदार आदी मन्यावर उपस्थित होते. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे वतीने गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार महापालिकेच्या आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दतंकाळे व डॉ अक्षता हळीगळी यांनी केले.