प्रत्येक पालक व ग्रामस्थांनी आपल्या गावातील शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे – अमोल उंबरजे
सोलापूर: लवंगी, ता. दक्षिण सोलापूर येथील स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महा एनजीओ फेडरेशन चे संचालक श्री. अमोल उंबरजे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर फुंडीपल्ले होते.



ध्वजारोहण अमोल उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “गावातील शाळा ही मुलांच्या भविष्यातील यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे प्रत्येक पालक व ग्रामस्थांनी आपल्या गावातील शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. हीच मुले पुढील काळात विविध क्षेत्रांत कार्यरत राहून राष्ट्रसेवा करतील.”
सूर्यकांत बगले व सोमनाथ बगले यांनी ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम शाळा सुरू करून एक शैक्षणिक आदर्श निर्माण केला आहे. सध्या शाळेत 550 विद्यार्थी शिकत असून, अजून सुमारे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत, ही शाळेच्या गुणवत्तेची साक्ष आहे.
कार्यक्रमास रिलायन्स फाऊंडेशन चे अजित मनमी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि गावातील मान्यवर गुरु बसावानंद (निंबाळ), अमोगसिद्ध कुलसंगे, प्रमोद बबळेश्वर, रफिक शेख, बसवराज माळगे, हणमंत बगले इ. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.