येस न्युज नेटवर्क : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) खेळण्यात येणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात आलीय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल असोसिएशननं पत्राद्वारे बीसीसीयकडं केली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याचा धोका पत्कारायचा नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यातही प्रेक्षकांना परवागनी देण्यात आली नव्हती. मात्र, तिसऱ्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा बीसीसीआयनं आज निर्णय घेतलाय.