सोलापूर : शनिवारी सकाळी अकरा वाजता गजानन क्लीनिक जूळे सोलापुर येथे प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदरहू सेंटरमुळे या परिसरातील जवळजवळ 100 नागरी वस्तीतील उपस्थिती जनतेस सोय झाली आहे .सदर कार्यक्रमास खासदार जय सिद्धेश्वर महाराज, डॉक्टर नरेंद्र काटीकर संचालक स्मार्ट सिटी, सभागृहनेता श्रीनिवास करली, प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका मनीषा हुच्चे, समाजसेवक परमेश्वर माळगे, सविता चव्हाण, पि.आर. कुलकर्णी , डॉक्टर सिद्धाराम बगले, श्रीशैल हिरेपट, नागेश धाबे, महांतेष झेंडेकर, शिवा अण्णा वाघमारे, अमित गिराम, स्वप्नील इंगळे, ऋतुराज मस्के, हर्षल लकडे, तृप्ती मुरगुंडे, प्रणिता चंद्रपाटले, किरण लकडे, शेखर शिंदे, शंकर माळी, पुंडलिक बनसोडे हे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी आर कुलकर्णी काका, अनिल चव्हाण,परमेश्वर माळगे, श्रीशैल हिरेपट यांनी विशेष परिश्रम घेतले.