सोलापूर – डॉ. मंजुनाथ व डॉ. लता पाटील यांच्या मितांशू हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि मितांशू -शुभम IVF सेंटरचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सोलापूर सहकारी रुग्णालायचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, अंबादास मिठ्ठाकोल, डॉ. विजयकुमार आरकाल, डॉ. माणिक गुर्रम, रमेश विडप आदी उपस्थित होते. प्रस्तावना डॉ. लता पाटील ह्यांनी केली. मान्यवरांचे सत्कार डॉ. मंजुनाथ व डॉ. लता पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी देवेंद्र कोठे, सत्यनारायण बोल्ली, डॉ. माणिक गुर्रम यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केले तर जगदीश दिड्डी यांनी आभार मानले.