• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, November 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

“९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५”चे उद्घाटन

by Yes News Marathi
November 26, 2025
in इतर घडामोडी
0
“९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५”चे उद्घाटन
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनविण्यास कटिबद्ध : राहुल नार्वेकर

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते “९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५”चे शानदार उद्घाटन बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी नेस्को एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक ४, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे झाले. “सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन” (SGMA) तर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श नार्वेकर यांनी सोलापूरला जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची आणि सोलापूर येथे शासनातर्फे कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.


यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार श् सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी होत असून ३०,००० युनिफॉर्म डिझाईन्स, १५,००० फॅब्रिक इनोव्हेशन्सचे प्रदर्शन येथे होणार आहे. भारतातील युनिफॉर्म उद्योगातील पहिला ‘एआय’ आधारित व्हर्च्युअल फॅशन शो या प्रदर्शनात आयोजित केला गेला आहे. ६५ अब्ज डॉलर्सच्या जागतिक युनिफॉर्म मार्केटमध्ये वाढीच्या संधी उघडणारे “मेक इन इंडिया”ला पाठबळ देणारे हे एक महत्त्वाचे बी२बी व्यासपीठ आहे.
हे प्रदर्शन नेसको एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक ४ येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे सोलापूरला जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनविण्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते सर्व करण्याचे आश्वासन दिले. “विधानसभा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आश्वासन देवू इच्छितो की सोलापूरच्या मागण्यांचा पाठपुरावा आम्ही विधिमंडळात करू. सोलापूरला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर गारमेंट हब बनविण्यासाठी प्रयत्न करू. पूर्ण जगात सोलापूर या क्षेत्रात आपला झेंडा रोवाल्याशिवाय रहाणार नाही. जागतिक केंद्र बनण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व सोलापूरमध्ये आहे. इथे विमानतळ सोय उत्तम आहे, इथे कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कुशल कामगार इथे उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूरला जागतिक गारमेंट हब होण्याची पूर्ण संधी आहे,” ते म्हणाले.
नार्वेकर पुढे म्हणाले की, सोलापूरला कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. “जोपर्यंत कौशल्य प्रशिक्षण केंद्र होत नाही, तोपर्यंत जागतिक स्तरावर स्पर्धा करणे कठीण असते. कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सोलापूरची मागणी जुनी आहे. त्यासाठी आमदार आणि माजी मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी भरपूर पाठपुरावा केला आहे. हे केंद्र लवकरच मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील आणि मी स्वतः त्यात लक्ष घालीन,” ते म्हणाले.

आ. सुभाष देशमुख म्हणाले की, वार्षिक प्रदर्शनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून ते आता अंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याचा मानस आहे. “मी वस्त्रोद्योग मंत्री असताना सोलापूरपासून सुरु झालेले हे गारमेंट प्रदर्शन देशाच्या विविध राज्यांमध्ये आयोजित केले गेले. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक स्तरावरसुद्धा त्याचा बोलबाला झाला आहे. आता लवकरच हे प्रदर्शन जागतिक स्तरावर भरविण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी

SGMA चे फेअर चेअरमन अजय रंगरेज, सचिव श्रीकांत अंबुरे यांनीही मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय फेअरमुळे युनिफॉर्म उद्योगात व्यवसाय वृद्धीसाठी, नव्या भागीदारींसाठी आणि डिझाइन-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे आयोजकांनी सांगितले.

Previous Post

मतदारांना ‘उल्लू’ बनविण्याचा प्रचार.. मूळ मुद्द्याला बगल..!

Next Post

कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण तुकडी क्र. ४ चा शुभारंभ

Next Post
कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण तुकडी क्र. ४ चा शुभारंभ

कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण तुकडी क्र. ४ चा शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In