सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी 753.06 किलो वॅट व देगाव येथील मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी 998.63 किलो वॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
देगाव मलनिस्सारण केंद्र येथे एकूण प्रतिदिन 3494 किलो वॅट तर प्रति महिना 104828 किलो वॅट वीज निर्मिती होणार आहे.तसेच यामधून प्रतिदिन 21,560/- रुपये तर प्रती महिना 6,46,790 रुपये इतकी सौर ऊर्जा निर्मिती मधून बचत होणार आहे.तसेच सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येते सौरऊर्जा प्रकल्पातून प्रतिदिन 2632 किलो वॅट तर प्रतिमहिना 78976 किलो वॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामधून प्रतिदिन 16,240 रुपये तर प्रति महिना 4,87,132 रुपये सौर ऊर्जा निर्मिती मधून बचत होणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी 753.06 किलो वॅट क्षमतेचा तसेच देगाव येथील मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी 998.63 किलो वॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प नक्त मापन प्रणालीवर अस्थापित करून कार्यान्वित करण्यात आला आहे. हे प्रकल्प अमृत अभियान अंतर्गत आस्थापित व कार्यान्वित होणारे हे महाराष्ट्रातील प्रथमच प्रकल्प आहे.अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
सोरेगाव व देगाव येथील प्रकल्प हे देशातील प्रथम प्रकल्प आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सोलापूर महानगरपालिका साकारत आहे याचा आम्हाला आनंद आहे. यापुढेही अश्याप्रकारचे कामे टप्प्या टप्प्याने करण्यात येतील अशी माहिती सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेचा सोरेगाव व देगाव येथील प्रकल्प हा देशातील प्रथम प्रकल्प आहे. याचा आम्हाला आनंद आहे. या सोलर प्रकल्पामुळे आर्थिक उत्पन्न वाढणारच आहे परंतु अजून सोलरवर काम करायची गरज आहे आपण वीजनिर्मिती करणं आहे आपलं काम आहे असं मत विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांनी बोलताना मांडले.
सोरेगाव व देगाव येथील सोलर प्रकल्पामुळे दर महिना १४ लाख रुपयांच्या विजेच्या बिलामध्ये बचत होणार आहे. अमृत योजनेतून हे प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहेत असे मत गटनेते चेतन नरोटे यांनी बोलताना मांडले.
यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते चेतन नरोटे, संजय धनशेट्टी, महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.