अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी, कार्यवाहपदी कवी देवेंद्र औटी
सोलापूर : सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक हा बीजमंत्र घेऊन सामाजिक समरसतेसाठी काम करणार्या समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या सोलापूर शाखेचे उद्घाटन किरीटेश्वर मठाचे मठाधिपती श्रीमनिप्र स्वामीनाथ महास्वामी, ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली, श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे यांच्या हस्ते झाले.
सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी, उपाध्यक्ष अरविंद मोटे, कार्यवाह कवी देवेंद्र औटी, सहकार्यवाह दिनेश मडके, कोषाध्यक्ष समीर कार्यकर्ते, सहकोषाध्यक्ष प्रा. मल्लिनाथ हुलसुरे, महिला आयाम प्रमुख वसुंधरा शर्मा-कुलकर्णी, महिला आयाम सहप्रमुख अमृता कल्याणी, युवती आयाम प्रमुख रुपा कुताटे, युवती आयाम सहप्रमुख श्रद्धा रोडग, युवा आयाम प्रमुख आनंद धडके, कार्यक्रम नियोजन आयाम प्रमुख प्रा. पुरुषोत्तम बगले, सहप्रमुख बिपीन सुरेश पाटील, ग्रंथालय आयाम प्रमुख गुरुनाथ गोविंदे, ग्रंथालय आयाम सहप्रमुख नागराज बगले, प्रकाशन, प्रकाशक आयाम प्रमुख यशवंत बिराजदार, सांस्कृतिक आयाम प्रमुख प्रा. डॉ. धन्यकुमार जीनपाल बिराजदार, प्रसिद्धी आयाम प्रमुख शरणप्पा फुलारी, पिंटू विभुते यांच्या निवडी करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, दशरथ वडतिले, अप्पासाहेब हत्ताळे, महेश स्वामी, गौरीशंकर दोड्याळे, सावित्री रोडगे आदी उपस्थित होते.
2001 साली सोलापुरात समरसता साहित्य संमेलन कै. प्रा. अनंत तोरो यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. स्वागताध्यक्ष आ. सुभाष देशमुख होते. प्रारंभी श्रद्धा रोडगे यांनी समरसता गीताचे गायन केले. प्रास्ताविक प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे यांनी केले. सूत्रसंचालन पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी यांनी केले.