सोलापूर : हदवाढ भाग झाल्यापासून वीस ते तीस वर्षापासून सदर शाहूनगर मध्ये कोणत्याच सुविधा नव्हत्या परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यापासून सतत नागरिकाच्या संपर्कात राहून कामे करीत आहेत असे सदर नगर मधील नागरिकांना समजल्यानंतर तेथील समस्या बाबत निवेदन दिले होते त्याची दखल घेत नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी प्रथम तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला. प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मनीष देशमुख यांचे वाढदिवसाचे औचित साधून मंजूर झालेल्या नगरोस्थान योजनेअंतर्गत रस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी विशाल गायकवाड,मधुसूदन जंगम, आनंद बिराजदार, दीपक जमादार,सुनील कांबळे, किशोर गायकवाड, शिवा पाटील, पाटील मुत्तया, सिद्राम सहगांवकर,राम भरले, विदुल भरले,मनोज कांबळे, अब्बू घोडके,अनिता पाटील, अनिता माने, अनुसया जाधव, गुरुबाई स्वामी, छाया जमदाडे, परमेश्वर धोतुरे, रितेश चीनिवार,निलाबाई घोडके, इंदुबाई भरले,वैशाली मकनापुरे,सौ.निमाबाई, पुतळाबाई राऊत,जयश्री राऊत,विश्वनाथ सुतार,दिसलु सहवाग,मनीषा वाघमारे, आदी उपस्थित होते व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून अनेक सुविधा पासून वंचित होतो.
परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यापासून सतत पाच वर्षे नागरिकाचे संपर्कात राहून अनेक नगराचा कायापालट केलेला आहे. त्यांना आमच्या नगरातील समस्या बाबत निवेदन दिल्यापासून आमच्या सुविधा पूर्ण होत आहेत त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने नागरिकाच्या मदतीला धावून येणारा नगरसेवक लाभला असे मनोगत तेथील नागरिकांनी व्यक्त केले व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केले.