सोलापूर शहरांमध्ये दमानी कॉम्प्लेक्स समोर सांगवी तालुका अक्कलकोट येथील प्रसिद्ध सेंद्रिय शेती उत्पादक ब्रह्म कुमार रघुनाथ कापसे यांच्या प्राकृतिक सेंद्रिय उत्पादने व रसवंती याचा शुभारंभ ब्रह्मकुमारी सुजाता बहन जी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या “आत्मा “सोलापूर चे डायरेक्टर मदन मुकणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अक्कलकोट येथे सांगवी गावात रघुनाथ कापसे यांची शेती असून सेंद्रिय ऊस उत्पादन करून त्यापासून रस, केमिकल विरहित गुळ , पेढे, चिक्की आदी पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जाते. सोलापुरातील वाढती मागणी लक्षात घेता दमानी कॉम्प्लेक्स समोरील गळ्यामध्ये ही उत्पादने सोलापूरकरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. सेंद्रिय शेती व विषमुक्त अन्नाचा प्रचार प्रसार केल्याबद्दल रघुनाथ कापसे यांचा सोलापूर कृषी विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडून गौरव ही करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी गवंडी सर, शंकररावजी खंडागळे, डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी, डॉक्टर प्रवीण ननवरे , ब्रह्मकुमारी प्रीती बहन, रेवनसिद्ध भाई , कृषी विभागातील अधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.