सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत मनपा शाळा क्र. 6 जोडबसवण्णा चौक, दाजी पेठ येथे फिजीओथेरेपी सेवेचा शुभारंभ मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते दि. 24/02/2023 रोजी करण्यात आला. सदर प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त (आरोग्य) विद्या. पोळ, आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे, शहर लेखा व्यवस्थापक श्री. सिध्देश्वर बोरगे डॉ. अदित्य झिपरे (फिजीओथेरपीस्ट), डॉ. तबस्सुम जमखंडी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर भौतिक उपचार (फिजीओथेरपी सेंटर) केंद्राकडून प्रामुख्याने कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यावर भौतिक उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रोथेरपी मध्ये टेन्स मशीन, अल्ट्रासाउंड, इन्टरेफेरन्टल थेरेपी, लेजर, काव्र्हीकल ट्रॅक्शन, लंबर ट्रॅक्शन, वॅक्स बाथ, एक्सरसाईज थेरेपी सुविधा दिव्यांगांना मोफत तर इतर सर्व नागरिकांना अत्यल्प दरात फिजीओथेरेपी सुविधा देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.