सोलापूर शहरांमधील नेहरूनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर येथे बालाजी अमाईन्स लि.च्या वतीने स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले.

शाळेत नेहरूनगर परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेमध्ये स्वच्छतागृहाची नितांत गरज होती म्हणून शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बालाजी अमाईन्स कडे स्वच्छतागृह देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार बालाजी अमाईन्सच्या वतीने स्वच्छता गृहाचे बांधकाम मंजूर करून दर्जेदार स्वच्छतागृह बांधून पूर्ण करण्यात आले.
या स्वच्छता गृहाचे उद्घाटन आज बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार, अर्थ विभाग प्रमुख अरुण मासाळ तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कादर शेख साहेब यांनी बालाजी अमाईन्सच्या वतीने नेहरूनगर शाळेबरोबरच जिल्ह्यातील अनेक शाळांना स्वच्छतागृह बांधून दिल्याबद्दल तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बहुमोल मदत करत असल्याबद्दल बालाजी अमाईन्स कंपनी चे कौतुक करून त्यांचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.
तसेच शाळेचा परिसर पाहून आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना मल्लिनाथ बिराजदार यांनी आज शाळेसाठी स्वच्छतागृह देत असताना मनोमन आनंद आणि समाधान वाटत असल्याचे सांगितले. याशिवाय पर्यावरणासाठी तसेच शिक्षण आणि आरोग्यासाठी बालाजी अमाईन्स कायम मदतीसाठी तयार असेल अशी भावना व्यक्त केली.
यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, बसवराज अंटद, इंजिनीयर नचिकेत शहा, उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, विस्ताराधिकारी बापूसाहेब जमादार, शालेय पोषण आहार समन्वयक ताजुमल शेख ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जाधव, बेबीताई राठोड, सर्व सदस्य आणि माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल थोरबोले यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आढावा देत शाळेच्या मागील चार वर्षाच्या प्रगतीचे सादरीकरण मान्यवरांच्या समोर केले तसेच शाळेला दर्जेदार स्वच्छतागृह बांधून दिल्याबद्दल बालाजी अमाईन्स च्या सर्व टीमचे आणि उपस्थितीबद्दल सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचे आणि माता पालकांचे आभार व्यक्त केले.