प्राचार्य डाँ.चिट्टे यांना सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
उत्तर सोलापूर : वडाळा येथील माऊली महाविद्यालयाने बांधलेल्या सौ.मीरा मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन मंगळवार दि. 31 रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डाँ.मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांनी दिली.
दरम्यान बारा वर्षांपूर्वी माऊली महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झालेले व नँक मुल्यांकनमध्ये महाविद्यालयाला बी प्लस-प्लस दर्जा मिळण्यासाठी गुणवत्ता सिद्ध केलेले प्राचार्य डाँ.जी.एन.चिट्टे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार यशवंत माने यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचेही जितेंद्र साठे यांनी सांगितले.ग्रामीण भागातील मुलींची उच्च शिक्षणाची गावातच सोय व्हावी, यासाठी संस्थेचे मार्गदर्शक व जिल्ह्याचे नेते काकासाहेब साठे यांनी वडाळा गावात माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबरोबरच पर्यावरणाच्या संतुलनासाठी शिक्षण संकुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती जपली पाहिजेत, ही आग्रही भूमिका काकांची असते.त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे व अचूक मार्गदर्शनामुळे संस्थेने गुणवत्तेत अव्वल दर्जा राखला असल्याचे सांगून साठे म्हणाले की, माऊली महाविद्यालयात बीए व बीएस्सीचे शिक्षण घेण्यासाठी परगावहून येणा-या मुलींची राहण्याची सोय व्हावी, ही काकांची तळमळ होती. युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) वसतिगृह बांधण्यासाठी दिलेल्या अनुदानातून आठ हजार स्क्वेअर फुटामध्ये 25 खोल्या बांधल्या असून 60 मुलींची राहण्याची सोय या वसतिगृहात सोय होणार आहे. दि. 31 रोजी कुलगुरु डाँ.फडणवीस यांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन होईल. आमदार माने अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीरामकाका साठे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर माऊली महाविद्यालयाच्या नटराज रंगमंचावर प्राचार्य डाँ.चिट्टे यांचा आ.माने यांच्या हस्ते सत्कार होईल.राजन पाटील अध्यक्षस्थानी असतील. कुलगुरु फडणवीस, बळीरामकाका साठे, माजी महापौर मनोहर सपाटे, महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे,राजन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, शहर अध्यक्ष भारत जाधव,महेश गादेकर, सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, संकेत पिसे यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी महाविद्यालयाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.