येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंकित बोरामणी दुरक्षेत्राच्या नविन इमारतीचे रिबीन कापुन उदघाटन संमारभ, तसेच पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतुन राबवण्यात आलेल्या सामान्य लोकांमध्ये पोलीसांचे उपस्थिती व गुन्हेगांरामध्ये पोलीसांचे भय राहण्याच्या उददेशाने विशेष पेट्रोलींग मोटार सायकलींचे सोलापूर ग्रामीण दलामध्ये अनावरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बोरामणी दुरक्षेत्र येथे करण्यात आले आहे. सदर कर्यक्रमास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतुल झेंडे, धनराज पांडे, कदम आदी उपस्थित होते. मंगळवार 26/01/2021 रोजी संध्याकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथुन सायकलीवरून सोलापूर ते हैद्राबाद मार्गे बोरामणी ता. दक्षिण सोलापूर येथे पोहचले होते.
सध्या चालु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने जिल्हाधिकारी शंभरकर आणि तेजस्वी सातपुते यांनी वाहतुक नियामांचे पालन करण्याबाबत, वाहन चालवत असताना घ्यावयाच्या दक्षेतेबाबत तसेच कोरानो रोगाच्या अनुशंगाने सोशल डिस्टसिंग पाळण्याबाबत लोकांना आवाहन केले आहे. बोरामणी दुरक्षेत्रची जुनी इमारत ही राष्ट्रीय महामार्गच्या रूंदीकरणामध्ये गेल्याने नविन इमारत बाधुंन दिल्याबाबत नॅशनल एथाॅरटी आॅफ इंडीया येथील पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
सदरच्या समारंभास जिल्हाधीकारी लींद शंभरकर,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, , उप आयुक्त धनराज पांडे, , एन एच ए आय अधिकारी संजय कदम, पोलीस उप अधीक्षक गृह सुर्यकांत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे,किशोर रक्ताटे, सारंग तारे, नितीन चपळगावकर, संजयकुमार सिंग व इतर सायकलिस्ट, पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, सोलापूर तालुका पो. स्टे., सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थीत सदरचे कार्यक्रम पार पाडले. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. डाॅ. साळुंखे यांनी केले.