सोलापूर : राऊंड टेबल हे युवा सदस्याचे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध समाजपयोही कार्य करून ६७ देशात उत्साहाने कार्य करत आहेत भारतात ६५००० सदस्य असून ३०० पेक्षा अधिक चॅप्टर्स असून शहरात असून विविध क्षेत्रातील उद्योजक, प्रोफेशनल सभासद माहीत. सोलापूरच्या तीन शाखांतर्फे मोहोळ येथ मूक बधिर मुले-मुलींसाठी २ खोल्या, सावळेश्वर येथे जुनिअर कॉलेज मधील ५ नवीन खोल्या, खोल्या नूतनीकरण आणि सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटल अशा तीन ठिकाणी एकाच दिवशी सुमारे ६५ लाखाचे सेवा प्रकल्प चे उदघाटन करून समाजात वेगळे स्थान मिळविले. मूकबधिर निवासी शाळा प्रकल्पासाठी अंदाजे १३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च, मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे समता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अंदाजे ३२ लाख रुपये खर्च व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अतिदसक्षता विभागाचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण चा खर्च १८ लाख ४० हजार अंदाजे झाले आहे सिव्हिल रुग्णालयातील मेडिसीन विभागात होणार आहेत. या सर्व प्रकल्पाचे उद्घाटन रंगनाथ बंग, वरदराज बंग, विजयकुमार पटेल, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर , फ़िलीप मौर्य, कीर्ती रुईया , तरंग शाह, राहुल वाधवा आणि हुसेन मुस्तफा यांची उपस्थित झाले. या प्रकल्पासाठी राऊंड टेबले चे सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल १५० चे चेअरमन रोहन शालगर, सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल १८७ चे चेअरमन डॉ. शशांक कार्वेकर आणि सोलापूर हाय फ्लायर्स राऊंड टेबल ३०९ चे चेअरमन रोहित राठी यांच्या संयुक्त पुढाकारातून हे तिन्ही प्रकल्प राबविण्यात आले आहेत. राऊंड टेबलचे श्री रोहन गाला, श्री आशुतोष राठी, आशिष तापडिया, पुष्कराज कोठारी, अभिजित मलानी, अजय सोनी, राहुल सोनी, सप्रेम कोठारी, धनंजय गोडबोले, कपिल जाजू, राज राठी, निशीत गाला, गुरुदीप दोडमनी, वासुदेव बंग, विष्णुकांत राठी उपस्थित होते