सोलापूर : पाटकुल ता.मोहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या २२ प्रकारच्या शारीरिक तपासणी करणाऱ्या अत्याधुनिक मशीनचे उद्घाटन शुभारंभ आ. यशवंत माने यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार यांनी स्वताच्या आरोग्य विषयक तपासणी केल्या
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण,शिक्षक नेते अनिल कादे गुरुजी,सरपंच शिवाजी भोसले,माजी सरपंच आढेगावकर सर,विरसेन देशमुख सर,वैद्यकीय अधिकारी डॉ.हिंदुराव काळे,डॉ.करिश्मा शेख,औषध निर्माण अधिकारी श्रीमंत खराडे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ जयवंत देशमुख सह इतर ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.