ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस आणि कर्वे समाजसेवा संस्था ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी(CSR) निधीतून “संपूर्ण” प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष करून गरोदर महिला व बालकांसाठी तसेच इतर गावातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरापुर येथे ऑपरेशन थिएटरमध्ये आणि महिला प्रसुती गृहासाठी देण्यात आलेल्या साहित्याचा लोकार्पण सोहळा दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस येथील CSR सेलचे संचालक डॉ. महेश ठाकूर आणि KINSS चे प्रकल्प व्यवस्थापक राहुल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरापूर गावच्या सरपंच वर्षाताई सावंत तर उद्घाटक सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.मोहन शेखर सर आणि ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे मानवी संसाधन व्यवस्थापक (HR) मा.सिताराम बेलदार सर, मा.धर्माधिकारी सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.पाथरुडकर सर,शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.काळे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा लोकार्पण सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कर्वे समाजसेवा संस्थेचे प्रकल्प समन्वयक मा.दिपक हेंड,क्षेत्र समन्वयक रुपाली कसबे आणि शोभा शेंडगे तसेच प्रकल्पात समाविष्ट असलेले सर्व आरोग्यसखी(आशा वर्कर ), अंगणवाडी सेविका, PHC चे सर्व आरोग्य कर्मचारी, या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक उपचारासाठी तसेच महिलांच्या प्रसूतीसाठी शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सर्व उपकेंद्राना म्हणजेच सर्व गावातील जवळजवळ ६२,३०४ नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.मोहन शेखर सर आणि इतर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील शिरापूर,मोरवंची,कोळेगाव,खुनेश्वर, भांबेवाडी आणि अष्टे या सहा गावच्या २२ अंगणवाड्यांना बेबी वेट मशीन, वजनकाटा,नवजात शिशुची उंची मोजण्यासाठी इन्फन्तोमिटर इ.साहित्याचे कीट देण्यात आले.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.मोहन शेखर सर यांनी PHC साठी सर्व आवश्यक साहित्य दिल्याबद्दल नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरविण्यास खूप मदत होणार असल्याचे सांगून ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस व कर्वे समाज सेवा संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी सर तर प्रास्ताविक कर्वे समाजसेवा संस्थेचे प्रकल्प समन्वयक मा.दिपक हेंड तर आभार साने सर यांनी मानले.
याशिवाय कर्वे संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक, संदिप खर्डेकर, आणि अध्यक्ष विनायक कराळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अतुलनीय पाठिंबा दिला आणि पुढे समाज कल्याणासाठी संस्थेच्या बांधिलकीवर भर दिला.