आज झालेली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक कमालीची वादळी ठरली. या बैठकीवेळी युवक काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.
आज झालेली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक कमालीची वादळी ठरली. या बैठकीवेळी युवक काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी अध्यक्ष कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी केली होती. त्यावरून हा वादा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
युवक काँग्रेसमधील एका गटाचा अध्यक्ष कुणाल राऊत यांना विरोध आहे. त्यातून हा गट कुणाल राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाला. हा गट कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होता. त्यातील काही जणांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी केली. मात्र त्यावरून तणाव निर्माण होऊन दोन गट आमनेसामने आले. तसेच या गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या.
हा प्रकार घडला तेव्हा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास हे तिथे उपस्थित होते. मात्र ते तिथून तातडीने निघून गेले. तिथून बाहेर पडताना त्यांनी कुठलीह प्रतिक्रिया दिली नाही.