येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 सोमवार १०मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ११६० व्यक्तींना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कालावधीत १७४७ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे २४ तासात जिल्ह्यातील ४७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय नवीन रुग्णांचा आढावा घेतला असता पंढरपूरमध्ये सर्वाधिक ३२८ माळशिरस मध्ये २३०, करमाळा १३५, बार्शी ११६ असे नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन बाधितांचा आकडा थोडासा घटल्यामुळे दिलासा मिळालेला असला तरी मृतांची संख्या अद्याप जास्त असल्यामुळे जिल्हा प्रशासन अजूनही चिंतेत आहे.