सोलापूर : महानगरपालिकेचा covid-19 चा २६ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात शहरातील ५७ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ७६ रुग्ण कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील प्रभाग निहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २३ मध्ये १४ आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये ८ नवीन रुग्ण आढळले आहेत.