सोलापूर : शहरातील २९ जून चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नवीन फक्त ४व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे . या कालावधीत रुग्णालयातून कोणीही घरी परतलेले नाही, त्याचप्रमाणे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही . प्रभाग क्रमांक १६ मध्ये दोन आणि प्रभाग क्रमांक २१ आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये प्रत्येकी एका नवीन व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. इतर सर्व २३ प्रभागांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.