येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा २२ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नवीन ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा ५० पेक्षा कमी झाल्याने पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत शहरांमधील ३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कालावधीत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या तब्बल ९६ आहे. प्रभागनिहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक १,३,४,९,१०,१४, १६,१९,२० अशा नऊ प्रभागांमध्ये नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही.