No Result
View All Result
- सांगली – लव्ह जिहाद व धर्मांतर बंदी कायदा करावा या मागणीसाठी शुक्रवारी इस्लामपूरमध्ये हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी इस्लामूपरचे नामकरण ईश्वरपूर करावे आणि संभाजी महाराज यांचा बलिदान दिन धर्मवीर दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आली.
- आज इस्लामपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या हिंदू गर्जना मोर्चाची सुरूवात शिवाजी चौकामध्ये करण्यात आली. गांधी चौक, ब्राम्हणपुरी, गणेश मंडई, यमा चौक मार्गे हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता करण्यात आली. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, धर्मातर रोखण्यासाठी कायदा करावा, गोवंश हत्त्या बंदी कायद्याची कठोरपणे अवलंब करण्यात यावी, उरण इस्लामपूरचे नामकरण उरण ईश्वरपूर करण्यात यावे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन धर्मवीर दिन म्हणून साजरा करण्यात यावा आदी पाच मागण्या या मोर्चाच्यावतीने करण्यात आल्या.
- या मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील, विक्रम पावसकर, राहूल महाडिक, संजय भागवत, आनंदराव पवार, वैभव पवार, धैर्यशील मोरे, मधुकर हुबाले, सुनिता निशीकांत पाटील, वंदना थोरात, शोभा जगताप, सुरेखा जगताप, जयश्री रणदिवे, स्मिता पवार, निता कदम आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No Result
View All Result